मित्रांना सांगितले अन्‌ तरुणाची नदीत उडी

शहरातील गरूड कॉलनीतील २८ वर्षीय तरुणाने बुधवारी (ता. २८) सकाळीश्री कालिकामाता मंदिराजवळील पांझरा नदीवरील मोरी पुलावरून उडी घेतली. अनेक नागरिकांनी ते पाहिल्यानंतर आरडाओरड सुरू झाली.  पोलिस, आपत्ती व्यवस्थापन व नियंत्रण पथक, अग्निशमन दलाकडे त्या तरूणाला वाचविण्यासाठी साकडे घेतले गेले. मात्र, देवपूर की पश्‍चिम देवपूर पोलिस ठाण्याची हद्द यासह विविध कारणांमुळे बचाव पथके विलंबाने घटनास्थळी  दाखल झाली. तोवर तो तरुण प्रवाहात बेपत्ता झाला. 
पांझरा नदीत रात्री नऊपर्यंत सुरू असलेल्या शोध मोहिमेनंतरही तो तरुण हाती लागू शकला नाही. रोहित प्रदीप बोरसे (वय २८) असे त्याचे नाव आहे. जयहिंद मंगल कार्यालय परिसरातील गरुड कॉलनीत विजय पाटील (प्लॉट क्रमांक ३०) यांचे वास्तव्य आहे. त्यांच्याकडे रोहित बोरसे वास्तव्याला होता. तो शिक्षण घेत होता. काही वादातून त्याने पांझरा नदीत उडी घेतली. देवपूर व पश्‍चिम देवपूर पोलिसांच्या हद्दीच्या वादात बराच वेळ शोध मोहीम अडकली.

नैराश्‍येत होता रोहित

रोहितने आत्महत्येपूर्वी मित्रांना घटनेची माहिती दिली. याबाबत त्याची मित्रांनी समजूत काढली. तरीही त्याने नदीत उडी घेतली. घटनेनंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली. पट्टीच्या पोहणाऱ्या तरुणांनी घटना दिसताच रोहितचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, पांझरा नदी प्रवाही असल्याने त्यांना शोध कार्यात यश मिळू शकले नाही. पोलिस दाखल झाल्यानंतर आपत्कालीन व्यवस्थापन व नियंत्रण पथकाच्या जवानांनी पांझरा नदीत उडी घेत तरुणाचा शोध सुरू केला. मात्र, बुधवारी रात्री नऊपर्यंत शोध कार्याला यश मिळू शकले नाही. काही दिवसांपासून रोहित नैराश्‍याच्या गर्गेत होता असे त्याचे काही मित्र सांगतात. त्याने सकाळी पांझरा नदीचा मोरी पूल गाठल्यानंतर मित्र धावपळ करत घटनास्थळी आले. तोपर्यंत रोहितने पांझरा नदीत उडी घेतली होती. रोहित हाती लागल्याशिवाय आनुषंगिक माहिती देऊ शकत नाही, असे पोलिसांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e