जळगावात शिवसेनेत राडा, उद्धव ठाकरेंच्या आदेशामुळे जुने शिवसैनिक संतापले

शिवसेनेमध्ये  दोन गट स्थापन झाल्यामुळे मोठी वाताहात झाली आहे. शिवसेनेकडून नव्याने मोर्चेबांधणी सुरू आहे. पण, जळगावमध्ये शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निर्णयामुळे शिवसैनिकांमध्ये वाद पेटला आहे. जुन्या शिवसैनिकांना डावलून नव्याख्यांना पदे दिल्याने जुन्या शिवसैनिकांनी जिल्हा प्रमुखांच्या घरासमोर ठिय्या मांडला आहे.

जळगाव शिवसेनेमध्ये वादाची मोठी ठिणगी पडली आहे. दोन दिवसांपूर्वी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून जळगाव जिल्ह्याची नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर जळगावात शिवसैनिकांचा वाद पेटला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने जळगाव जिल्ह्यात शिवसेनेची नवी कार्यकारणी जाहीर झाल्याने भुसावळ तालुक्यातील जुने शिवसैनिक संतप्त झाले आहे 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने जळगाव जिल्ह्यात शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त जाहीर करण्यात आल्या आहेत. मात्र नव्याने जाहीर करण्यात आलेल्या नियुक्त्यांमुळे भुसावळ तालुक्यातील जुने शिवसैनिक चांगलेच नाराज झाले आहे. जुन्या शिवसैनिकांनी थेट वरणगाव येथील जिल्हाप्रमुखांचे घर गाठुन जिल्हाप्रमुखांच्या घरासमोर तब्बल दोन तास ठिय्या मांडत जिल्हाप्रमुखांचा शिवसैनिकांनी तीव्र निषेध केला आहे. तर भुसावळ तालुक्यातील शिवसैनिक हे संघटनेच्या वरिष्ठांना वेठीस धरण्याचा काम करत असून शिवसैनिकांनी केलेल्या कृत्य हे निषेधार्य असल्याचे मत शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांनी व्यक्त केले आहे.


Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e