गैरकृत्याप्रकरणी नवविवाहीतेकडून गुन्‍हा दाखल; कारवाई नसल्‍याने पोलिस अधीक्षकांकडे विवाहीतेची याचना

जळगाव : भडगाव तालुक्यातील माहेर असणाऱ्या पीडितेचे सासरच्या मंडळींनी शारीरिक शोषण केल्याप्रकरणी  गुन्हा दाखल आहे. दाखल गुन्ह्यात तीन महिने उलटून कारवाई होत नाही. म्हणुन पिडीतेने आज  पोलिस अधीक्षकांना भेटून कैफीयत मांडली. संशयीतांना अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी पिडीताने निवेदनाद्वारे केली आहे.
पिडीतेने दिलेल्या निवेदनात नमुद केल्याप्रमाणे, भडगाव तालुक्यातील पीडितेचा विवाह नाशिक येथील महेश सुधाकर देवरे याच्याशी (१९ डिसेंबर २०२१) झाला होता. शेती विकुन पित्याने मुलीच्या लग्नात १० लाख रुपयांचा खर्च आणि १० तोळ्यांचे  सोन्याचे दागिने बनवून दिले होते. ते सर्व हिसकावुन विवाहितेसोबत पती महेश देवरे याने अनैसर्गिक कृत्यासभाग पाडले. सासरा सुधाकर देवरे, मावस दीर मिलिंद पाटील अशांनी पीडितेवर अत्याचार केले.

गैरकृत्यास लावले

संशयीतांनी पीडितेला पैशांसाठी गैरकृत्यास भाग पाडून सततच्या शारीरिक शोषणाला कंटाळून माहेरी परतल्यानंतर पीडितेने भाऊ आणि वडील यांच्यासोबत भडगाव पोलीसात (२९ मे २०२२) तक्रार दिल्यावरुन पती महेश देवरे, सासरे सुधाकर देवरे, सासू सरला देवरे, नणंद प्रतिक्षा देवरे, दुसरी नणंद दक्षा देवरे, मावस दीर मिलिंद पाटील, सुभाष पाटील (सर्व रा. आनंदनगर, पाथर्डी फाटा, नाशिक) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल होवुन सासरा सुधाकर देवरे याला अटक झाली. मात्र इतर संशयीतांना तीन महिने उलटूनही अटक झाली नाही. त्यांना तत्काळ अटक करण्याची मागणी पिडीतेने पेालिस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात नमुद केली आहे.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e