अमरावती जिल्ह्यात इयत्ता नववीपर्यंत शिक्षण घेतलेल्या एका मुस्लीम तरुणाने एका उच्चशिक्षित हिंदू मुलीशी बळजबरीने विवाह लावल्याचा धक्कादायक आरोप भाजप नेते आणि राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांनी केला आहे. संबंधित व्यक्तीने मुलीला बळजबरीने तिची संमती नसताना सुद्धा विवाह लावून दिलं. आता तिची प्रकृती सुद्धा ठीक नसल्याने ती सध्या अमरावती जिल्हा आणि सामान्य रुग्णालयात उपचार घेत आहे, अशी माहिती अनिल बोंडे यांनी दिली.
खासदार अनिल बोडे यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात जाऊन सदर तरुणीची भेट घेतली आणि तिला धीर दिला. ज्या ठिकाणी हा विवाह झाला ती संस्था आणि वकील बोगस असल्याचादेखील आरोप अनिल बोंडे यांनी केला आहे. तसेच यावेळी खासदार अनिल बोंडे यांनी मुस्लीम समाजाला गंभीर इशारा दिला आहे. आपले पोरं सांभाळा. जबरदस्तीने लग्न लावून देत असतील तर त्याचे परिणाम चांगले होणार नाही, असा इशारा त्यांनी यावेळी दिला
कोणत्याही आमिषाला बळी पडू नका आणि तुमचं आयुष्य बरबाद करू नका, असं आवाहन देखील अनिल बोडे यांनी यावेळी केलं. तर दूसरीकडे विश्वहिंदू परिषद, बजरंग दल या प्रकारणाविरुद्ध आवाज उठवणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे अमरावतीत पुन्हा एकदा मोठ्या हालचाली सुरु झाल्याची सूत्रांची माहिती आहे.
दरम्यान, अनिल बोंडे यांनी याआधी अमरावती जिल्ह्यातील केमिस्ट उमेश कोल्हे हत्याकांड प्रकरणाचा मास्टमाईंड असलेला आरोपी शेख इरफान याच्यावरही लव्ह जिहादचा आरोपी असल्याचा दावा केला होता. या हत्याकांडाचा मास्टरमाइंड शेख इरफान याने इंदोर येथे एका लग्न झालेल्या हिंदू मुलीला गुंगीचे औषध देऊन बलात्कार केला. त्या हिंदू मुलीला जबरदस्ती बुरखा घालायला लावला. मध्यप्रदेश पोलिसांनी शेख इरफानवर लक्ष ठेवण्याच्या सूचनाही दिल्या होत्या. मात्र, अमरावती पोलिसांनी शेख इरफानवर लक्ष न ठेवल्याने उमेश कोल्हे यांचा खून झाला. सिटी कोतवाली पोलीस ठाण्यातील एक पोलीस इरफानला संरक्षण देत असल्याचा आरोपही बोंडे यांनी केला होता. पोलिसांनी अमरावतीत तातडीने कोंबिंग ऑपरेशन राबविले पाहिजे, अशी मागणी खासदार बोंडे यांनी केली होती.
0 Comments