गांजा तस्करांचा सुळसुळाट, पोलिसांच्या धाडीत ६३ किलो गांजा जप्त, तीन आरोपी ताब्यात

जालना : शहरात गांजा तस्करांनी धुमाकूळ घातल्याने खळबळ उडाली आहे. छुप्या मार्गाने जालना शहरात गांजा विक्रीचा धक्कादायक प्रकार सुरु असल्याची खबर पोलिसांनी मिळाली. तस्कर एका कारमधून ६३ किलो गांजा जालना शहरात विक्रीसाठी घेवून येत होते. परंतु, रोहनवाडी पुलाजवळ पोलिसांनी सापळा रचला.

त्यावेळी पुलाच्या दिशेने रस्त्यावरून येणारी कार पोलिसांनी थांबवली. या कारची झाडाझडती घेतली असता पोलिसांना ५ बॅग आढळल्या. या बॅगेत ६३ किलो गांजा असल्याने पोलिसांनी एकूण १२ लाख ६४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतलं असून गांजा विक्रीसाठी वापरण्यात येणारी कारही जप्त केली आहे 

मिळालेल्या माहितीनुसार, जालना शहरात गांजा विक्रीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने पोलीस यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. तस्कर एका कारमधून ६३ किलो गांजा जालना शहरात विक्रीसाठी घेवून येत होते. परंतु, पोलिसांनी वेळीच सापळा रचून गांजा तस्करांच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईत ६३ किलो गांजा जप्त केला असून तीन तस्करांना ताब्यात घेतलं आहे. याप्रकरणी जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e