गणेश विसर्जनावेळी बुडणाऱ्या बालकाला वाचवितांना युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू

जामनेर  : जामनेर शहरातील गणपती विसर्जन करीत असताना कांग नदीपात्रातील  बोदवड रोडवरील पुलाखालील बंधाऱ्यात गणेश विसर्जनासठी गेला होता. पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली. एका लहान बालकाला पाण्यात बुडताना वाचवून स्वतः बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली 
किशोर राजू माळी (वय 30) असे मयत युवकाचे नाव आहे. दोन तासांच्या परिश्रमानंतर किशोर याचा मृतदेह सापडला. याबाबत जामनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे 
कांग नदी पात्राच्या बोदवड पुलाखाली गणपती विसर्जनासाठी आलेला एक लहान मुलगा बुडत होता. हे पाहून गणेशवाडी येथील रहिवासी किशोर माळी याने क्षणाचाही विलंब न करता उडी घेऊन त्या मुलाचे प्राण वाचविले. मात्र हे करीत असताना किशोर हा बुडू लागल्याने त्याचा बुडून दुर्दैवी अंत झाला. त्याच्या पश्चात आई , वडील, पत्नी , दोन मुली, एक लहान भाऊ असा परिवार आहे.

कर्ता पुरुष गेला

घरातील कर्ता पुरुष गेल्याने माळी परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून या दुर्दैवी घटनेने जामनेर शहरातील गणेशवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e