शिसाका भाडे कराराने देण्याचा ठराव मंजूर

शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखाना भाडे कराराने  देण्याचा ठराव  नुकत्याच झालेलेल्या विशेष सर्वसाधारण सभा मंजुर करण्यात आला. त्यांनी सर्वांनी आनंद व्यक्त केला.

सभेला आ.अमरिशभाई पटेल, आ. काशिराम पावरा, जि.प.चे अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, प्रियदर्शिनी सहकारी सूतगिरणीचे चेअरमन भूपेशभाई पटेल, शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखाना चेअरमन माधवराव पाटील, व्हाईस चेअरमन दिलीप पटेल, माजी नगराध्यक्ष प्रभाकरराव चव्हाण, शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती नरेंद्रसिंग सिसोदिया, शिरपूर पंचायत समिती सभापती सत्तरसिंग पावरा, साखर कारखाना संचालक राहुल रंधे, प्रकाश चौधरी, नारायणसिंग चौधरी, के.डी.पाटील, संग्रामसिंग राजपूत, वासुदेव देवरे, दिगंबर पांडू माळी, भरत पाटील, बन्सीलाल पाटील, धनंजय पाटील, जयवंत पावरा, सौ. सुचिता पाटील, सौ. मंगला दोरिक, जि.प सदस्य देवेंद्र पाटील, योगेश बोरसे, राजगोपाल भंडारी आदी उपस्थित होते.

प्रास्ताविक व सूत्रसंचालन माजी नगराध्यक्ष प्रभाकरराव चव्हाण यांनी केले. सुरुवातीला अनेक दिवंगत मान्यवरांना श्रद्धांजलीचा ठराव करुन सामुहिक श्रद्धांजली वाहण्यात आली.

त्यानंतर, शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखाना मर्यादित शिवाजीनगर, दहिवद ता. शिरपूर (महाराष्ट्र) हा बहु-राज्यस्तरीय सहकारी साखर कारखाना भाडे कराराने देण्याबाबत संचालक मंडळाच्या मागील सभेत मंजूर झालेल्या ठरावानुसार विचारविनिमय करून अंतिम निर्णय घेण्याबाबतचा ठराव सूचक प्रभाकरराव चव्हाण यांनी मांडला.

माजी मंत्री आ.अमरिशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच टेंडरबाबत अंमलबजावणी होईल, असेही त्यांनी जाहिर केले. सर्वानुमते हा ठराव मंजूर करण्यात आला. अनुमोदन मोहन पाटील यांनी दिले.

सर्वसाधारण सभेला संचालक, मंडळ, सभासद, शेतकरी, विविध शेतकरी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी साखर कारखाना भाडे कराराने देण्याचा ठराव मंजूर झाल्याबद्दल उपस्थित सर्वांनी आनंद व्यक्त केला. राष्ट्रगीताने विशेष सर्वसाधारण सभेचा समारोप झाला.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e