नंदुरबार येथील लोकमान्य टिळक जिल्हा वाचनालय नंदुरबार यांच्यातर्फे हुतात्मा शिरीषकुमार, धनसुखभाई शाह, घनश्यामदास शाह, शशीधर केतकर, लालदास शाह या विद्यार्थ्यांच्या हौतात्म्यास दि.9 रोजी 80 वर्षे पूर्ण झाले आहे.
त्यानिमित्त दि.9 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजता शहिद स्मारक येथेपोलीस दलातर्फे मानवंदना देण्यात आली.हुतात्मा स्मारक चौक येथे कार्यक्रमांचे आयोजन शहीद स्मृती संस्थेतर्फे करण्यात आले होतेे.
कार्यक्रमास प्रमुख पाहूणे म्हणुन धुळे-नंदुरबार मध्यवर्ती बँक संचालक व माजी आ.प्रा.शरद पाटील (धुळे) व सुप्रसिध्द नाटयकर्मी शंभू पाटील (जळगांव), समारंभाचे अध्यक्षस्थानी अॅड. रमणलाल शाह, जिल्हा पालीस अधिक्षक पी.आर.पाटील,पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, किर्तीकुमार सोलंकी, मनिष शाह, प्रा.डॉ.पितांबर सरोदे, निंबाजीराव बागुल, पांडूरंग माळी, प्रा.राजेंद्र शिंदे, शरदकुमार शाह, शितल पटेल, तुषार सोनवणे, प्रविण पाटील, जितेंद्र लुळे, प्रदीप पारेख, कैलास मरराठे, निलेश शाह आदी उपस्थीत होते
0 Comments