धुळे : धुळे तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीमधून गेल्या काही दिवसांपूर्वी दुचाकी चोरी गेल्याची तक्रार दाखल करण्यात आलेली होती. या दुचाकी चोरांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे
धुळ्यात गेल्या काही दिवसांपासून दुचाकी चोरांनी चांगलाच उच्छाद मांडला होता. याबाबत प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांना गुप्त माहितीदारा मार्फत माहिती मिळाली असता पथकाने धुळे शहरातील दोघांना ताब्यात घेतले. त्यांना विश्वासात घेतले व दुचाकीचोरी संदर्भात त्यांना विचारणा केली असता त्यांनी दुचाकी चोरल्याची कबुली दिली आहे.
धुळे तालुका पोलिसांच्या स्वाधिक
दोघाही चोरट्यांना धुळे तालुका पोलिसांच्या स्वाधीन केले असून त्यांनी आणखी कुठे कुठे दुचाकी चोरी केल्या आहेत. याचा संपूर्ण तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथका सह धुळे तालुका पोलीस करीत आहेत.
0 Comments