हिंगणघाटमध्ये चोरट्यांचा सुळसुळाट, पोलीस असल्याचं सांगून भररस्त्यात वृद्धाला लुटलं

हिंगणघाट : येथे चोरट्यांचा सुळसुळाट सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलीस असल्याचं सांगून दोन चोरट्यांनी एका वृद्धाला लुटल्याची घटना घडलीय. रस्त्यावरून चालत जात असताना एका वृद्धाला दुचाकीवरून येणाऱ्या दोघांनी  पोलीस असल्याचं सांगितलं. त्यानंतर वृद्धाकडे असलेली पैशांची पिशवी लंपास करून ५० हजरांची  चोरी केली. त्यानंतर चोरट्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. ही घटना हिंगणघाट येथील चौधरी चौक परिसरात घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून हिंगणघाट पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, समुद्रपूर तालुक्याच्या नारायणपूर येथील बबन माधव जवादे (वय ६५) यांची प्रकृती खराब असल्याने ते हिंगणघाटील रुग्णालयात आरोग्य तपासणीसाठी आले होते. त्यांच्याजळ ३० हजार रुपयांची रोख रक्कम होती.मात्र,आणखी पैसे काढण्यासाठी ते पोस्ट ऑफीस कार्यालयात गेले आणि तेथून २० हजार रुपये काढले. त्यानंतर ते पोस्टातून बाहेर पडत रस्त्याने चालत निघाले.
त्यानंतर दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी आम्ही पोलीस असल्याची बतावणी करत वृद्धाला थांबवले. दोघांनी हातचलाखीने त्यांच्याजवळील पिशवीत असलेली ५० हजार रुपयांची रक्कम घेत दुचाकीने धूम ठोकली.बबन जवादे यांनी पिशवी पाहिली असता त्यांना पैसे दिसून आले नसल्याने त्यांनी थेट हिंगणघाट पोलीस ठाणे गाठून याबाबतची तक्रार दिली. पोलिसांनी अज्ञात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e