शिंदखेडा विज वितरण कार्यालयात शेतकऱ्यांचा आक्रोश; विजेच्‍या लपंडावाने हैराण

शिंदखेडा  विजपुरवठा वेळोवेळी खंडित होणारा सुरळीत करण्यात यावा यासाठी विज वितरण कार्यालयात आज विविध पक्षांचे पदाधिकारी व शेतकरीसह  नगरपंचायत माजी प्रभारी नगराध्यक्ष व  काँग्रेसचे गटनेते दिपक देसले यांच्या नेतृत्वाखाली धडक दिली. यावेळी विजवितरण कंपनीचे सहा. अभियंता व्ही. जे. बोरसे यांना निवेदन देण्यात आले.
शहरात व शेतातील विज पुरवठा गेल्या एक महिन्यापासून अवेळी दिवसांतून केव्हाही गुल होते. शहरासह परिसरात विजेचा मोठ्या प्रमाणावर लपंडाव सुरू आहे. नेहमीच वरुन गेली आहे असेच विज वितरण कार्यालयाकडून सांगण्यात येते. कधी फोन स्विच ऑफ असतो. शिंदखेडा  येथील कार्यालयावर कुणाचेही वचक नाही. शिवाय अधिकारी निवासी राहत नाही. सर्व मनमानी कारभार सुरू असून अतोनात हाल होत आहेत

शिंगाडे मोर्चा काढण्याचा इशारा

शेकडो शेतकरी व विविध पक्षांचे पदाधिकारी एकत्रित येऊन कार्यालयावर धडक देत निवेदन दिले. विद्युत पुरवठा कंट्रोल करण्याचे काम सी.टी. ही यंत्रणा करते. म्हणून वीज खंडित होत असून ती समस्या दोन दिवसांत सुरळीत करण्याचे आश्वासन अभियंता बोरसे यांनी दिले. त्यानंतर संतप्त नागरिकांनी दोन दिवसांत ह्यावर कारवाई न झाल्यास पुढील दोन दिवसांत कार्यालयासमोर शेतकऱ्यांचा शिंगाडे मोर्चा काढण्याचा इशारा दिला. होणारे परिणामास विज वितरण कंपनी जबाबदार राहील.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e