वैद्यकीय सरावावेळी या मुन्नाभाईने उपचारासाठी आलेल्या एका रुग्णाला चक्क खूर्चीत बसवलं आणि सलाईन लावलं होतं. हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर मालेगावात खळबळ उडाली होती. अखेर याप्रकरणी रितसर तक्रार करण्यात आली आणि त्यानंतर या बोगस डॉक्टरचा पर्दाफाश करण्यात आलाय.
मालेगाव : नाशिक जिल्हायातील मालेगाव तालुक्यामध्ये एका बोगस डॉक्टरला अटक करण्यात आली. कोणतीही डिग्री नसताना वैद्यकीस सेवा देणाऱ्या या बोगस डॉक्टरनं चक्क दोन खोलीचं रुग्णालय थाटलं होतं. अखेर या डॉक्टरचं बिंग फुटलं असून त्याच्यावर कारवाई करण्यात आलीय. मालेगावच्या दातार नगर भागात ही घटना उघडकीस आलीय. रुग्णांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या आणि कमाई करणाऱ्या बोगस डॉक्टरांवर कठोरातली कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता लोकांकडून केली जाऊ लागली आहे.
कुठलीही वैद्यकीय पदवी नसताना चक्क दोन खोलींचं रुग्णालय उभारणाऱ्या मालेगावातील या मुन्नाभाईचं नाव अन्सारी मोहम्मद वसीम हाजी अब्दुल रशिद असं आहे. मालेगावचा मुन्नभाई असलेल्या या तरुणावर अखेर बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. मालेगावच्या पवारवाडी पोलिसांकडून याप्रकरणी पुढील कारवाई सुरु आहे.
वैद्यकीय उपचारासाठी अन्सारी या बोगस डॉक्टरकडे येत असत. तर कोणताही डिग्री नसलेल्या मालेगावच्या या ‘मुन्नाभाई’ने अजब प्रकार केला. त्यामुळे त्याचं बिंग फुटलंय. अखेर मनपा उपायुक्त आणि आरोग्य अधिकाऱ्यांनी या बोगस डॉक्टरला रंगेहाथ अटक केली आहे.
वैद्यकीय सरावावेळी या मुन्नाभाईने उपचारासाठी आलेल्या एका रुग्णाला चक्क खूर्चीत बसवलं आणि सलाईन लावलं होतं. हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर मालेगावात खळबळ उडाली होती. अखेर याप्रकरणी रितसर तक्रार करण्यात आली आणि त्यानंतर या बोगस डॉक्टरचा पर्दाफाश करण्यात आलाय.
मनपा उपायुक्त, आरोग्य अधिकारी आणि पोलिसांनी संयुक्तपणे केलेल्या कारवाईनंतर आता अन्सारी मोहम्मज वसीम हाजी अब्दुल रशिद याची आता कसून चौकशी केली जाते आहेत. या बोगस डॉक्टरने दोन खोल्यांचं रुग्णालय थाटलं होतं. त्याठिकाणीही कसून तपास केला जातोय. बोगस डॉक्टरच्या बोगस रुग्णालयातील औषधं, सामान यांची चौकशी आता केली जाईल.
0 Comments