पुण्यातील लोणी काळभोर परिसरात अंधश्रद्धेच्या नावाखाली एका २६ वर्षीय उच्चशिक्षित सुनेचा अमानुष छळ करण्यात आला. काळे कपडे घातल्यास तुला मूल होणार नाही, अश्लील व्हिडिओ दाखवून तिच्यासोबत अनैसर्गिक कृत्य करणे, मारहाण करणे यासारखे प्रकार वारंवार घडले.
यानंतर या महिलेने दिलेल्या तक्रारीवरून सासरच्या लोकांविरुद्ध लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पती प्रतीक शरद गिरमे, सासरे शरद कृष्णाजी गिरमे, सासु सुरेखा शरद गिरमे आणि इतरांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या महिलेचे सासरवाडी हडपसर परिसरात असल्याने सध्या हा गुन्हा हडपसर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी महिला आणि तिचा पती उच्चशिक्षित आहेत. तर सासू-सासरे आणि दिर एका धार्मिक संस्थेची संबंधित आहेत. मात्र सुनीला अंधश्रद्धेच्या नावाखाली सासरची लोक सतत त्रास देत होते.
काळे कपडे घालू नये, काळे कपडे घातल्यास मूल होत नाही, माताजी नी दिलेले कुंकू लावण्यास भाग पाडणे, कुंकू पुसल्यास शिवीगाळ करून मानसिक त्रास देणे असे प्रकार वारंवार सुरू होते. याशिवाय लग्नानंतर पतीने वारंवार पॉर्न व्हिडिओ दाखवून फिर्यादीवर अनैसर्गिक अत्याचार केले होते. दरम्यान या सर्व प्रकारानंतर पिडीतेने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून हडपसर पोलीस अधिक तपास करत आहेत.
0 Comments