श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथील एकलव्य संघटनेचे तालुकाध्यक्ष दीपक बर्डे यांच्या मृतदेहाची गोदावरी नदीत सुरु असलेल्या शोधमोहीमेला जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी भेट देऊन माहिती घेतली.
गुरुवार दि.१५ सप्टेंबर रोजी दुपारी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, पोलिस निरीक्षक विजय करे यांचे समवेत नेवासा तालुक्यातील रामडोह, वरखेड, प्रवरासंगम, गोपाळपूर गावांना भेट देवून तपासाबाबत माहिती घेतली.
नदीकाठच्या गावातील ग्रामस्थांची चर्चा करून शोध मोहीम बाबत त्यांनी सूचना केली.यावेळी रामडोहचे सरपंच ज्ञानदेव बोरुडे, पोलिस पाटील संतोष भुंगासे, ज्ञानेश्वर भंडारी, अशोक बोरुडे, कचरू परसय्या व ग्रामस्थ उपस्थित होते.
भोकर येथील दीपक बर्डे नोकरीसाठी पुण्याला जातो म्हणून घरातून बाहेर पडला होता. तेव्हापासून तो गायब आहे. याच घटनेच्या तपासासाठी भाजपचे नेते नितेश राणे यांनी श्रीरामपूर येथे आक्रोश मोर्चा काढला होता.
0 Comments