विवाहितेची विहीरीत उडी घेवून आत्महत्या

अकोले घर बांधण्यासाठी माहेरुन 5 लाख रुपये आणावेत या कारणासाठी टहाकरी येथे नांदत असलेल्या विवाहीतेचा शारिरीक व मानसिक छळ करण्यात आला. या छळास कंटाळून सदर विवाहीतेने विहिरीत उडी घेवून आत्महत्या केली. याप्रकरणी अकोले पोलीस ठाण्यात पती व सासू विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोनाली मयुर एखंडे (रा. टहाकरी, ता. अकोले) असे मयत विवाहितेचे नाव आहे. सोनाली हिचा 20 मे 2022 रोजी मयुर एखंडे याच्याबरोबर विवाह झाला होता. त्यापासून ती सासरी नांदत होती. मात्र पती व सासूकडून तिचा नेहमीच शारिरीक व मानसिक छळ सुरु होता. पती मयुर हौशीराम एखंडे व सासू मंगल हौशीराम एखंडे हे सोनाली हिला त्रास देत होते. तु जर कुणाला काही सांगितले तर तुला नांदू देणार नाही, असा दम तिला देण्यात येत होता. काही दिवसांनी सोनाली ही माहेरी आली. तिने आई-वडिलांना सर्व हकिकत सांगितली.

आई-वडिलांनी तिला समाजावून सांगत पुन्हा नांदण्यास पाठवून दिले. मात्र संगमनेर येथील जागेवर घर बांधण्यासाठी सोनाली हिने माहेरुन पाच लाख रुपये आणावेत यासाठी तिचा पुन्हा छळ सुरु झाला 

दरम्यान सोनाली गरोदर होती. पती व सासू यांनी तिला कुठल्यातरी गोळ्या देवून तिचा गर्भपात केला. त्यामुळे तिच्या पोटात दुखत होते. या शारीरिक व मानसिक छळास कंटाळून सोनाली एखंडे हिने गुरुवार दि. 15 सप्टेंबर 2022 रोजी विहीरीत उडी घेवून आत्महत्या केली.
याबाबत विजय एकनाथ आंबरे यांनी अकोले पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी मयुर हौशीराम एखंडे व सासू मंगल हौशीराम एखंडे यांच्या विरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 430/2022 भारतीय दंड संहिता 306, 304 (अ), 498 (अ), 312, 504, 34 प्रमाणे दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.



Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e