मोबाईलवर आत्महत्येचे स्टेटस ठेवत पोलीस कर्मचारी झाला बेपत्ता; परभणी पोलिसांमध्ये खळबळ

परभणीच्या पाथरी पोलीस (Police) ठाण्यामधील एका पोलीस कर्मचाऱ्याबाबत धक्कादायक वृत्त हाती लागलं आहे. परभणीतील पोलीस कर्मचारी वरिष्ठाच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करण्याबाबत व्हाट्सअॅप स्टेटस ठेवून बेपत्ता झाले आहेत. या घटनेमुळे परभणीमधील पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. रफिक मुस्ताख अन्सारी असे पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे 

मिळालेल्या माहितीनुसार, रफिक मुस्ताख अन्सारी हे पोलीस कर्मचारी आत्महत्या करण्याबाबतचा स्टेटस ठेवून बेपत्ता झाले आहेत. रफिक हे परभणीच्या पाथरी पोलीस ठाण्यामध्ये सध्या कार्यरत आहेत. रफिक हे वरिष्ठाच्या त्रासाला कंटाळल्याने त्यांनी थेट आत्महत्या करण्याबाबत व्हाट्सअॅप स्टेटस ठेवले.

'आज रोजी पो.नि. राहिरे साहेब यांनी मला अपमानित करून मला वाईट वागणूक दिले आहे. मला खूप वाईट वाटते आत्महत्या करावे या सारखे पाऊल उचलावसे वाटते' असे स्टेटस ठेवून पोलीस कर्मचारी रफिक मुस्ताख अन्सारी सकाळपासून बेपत्ता झाले आहेत.

दरम्यान, पोलीस कर्मचारी रफिक मुस्ताख अन्सारी बेपत्ता झाल्यानंतर नातेवाईकांनी दिवसभर शोध घेतला पण शोधला लागला नाही. पोलीस कर्मचारी रफिक स्टेटस ठेवत मोबाईल देखील बंद करून ठेवला आहे. अखेर नातेवाईकांनी पोलीस स्टेशनमध्ये एकच गोंधळ केला. त्यानंतर पोलिसांना पोलीस कर्मचारी रफिक शोधण्याची वेळ आली आहे.



Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e