गुटख्याची तस्करी रोखली; २७ लाखांचा मुद्देमाल जप्त

शिरपूरकडून धुळेमार्गे औरंगाबादकडे होणारी गुटखा तस्करी पोलिसांनी सापळा रचून रोखली. या कारवाईत  पोलिसांनी १२ लाखांचा  गुटखा व आयशरसह एकूण २७ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी मोहाडी पोलिस ठाण्यात वाहनचालक, क्लिनर व वाहनमालकाविरूद्ध गुन्हा दाखल झाला 
औरंगाबाद महामार्गावरून शिरपूरकडून धुळेमार्गे गुटखा तस्करी होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे पोलिसांनी शनिवारी (ता.२४) पहाटे पाचच्या सुमारास औरंगाबाद महामार्गावर सापळा रचून हॉटेल फायफायजवळ संशयित ट्रक पकडला. मात्र, वाहनावरील चालक व क्लीनरसह संशयित पसार झाले. पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता त्यात गुटख्याचा साठा आढळून आला.

२७ लाखाचा मुद्देमाल जप्‍त

सदर कारवाईत नऊ लाख ६० हजारांचा राजनिवास पानमसाला, दोन लाख ४० हजारांची एल-०१ जाफरानी जर्दा असा बारा लाखांचा गुटखा व १५ लाखांचे वाहन असा एकूण २७ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी किशोर हिंमत बाविस्कर यांनी मोहाडी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन वाहनावरील चालक, क्लीनर व वाहनमालक अशा तिघांविरूद्ध गुन्हा दाखल झाला.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e