घरात शिरत बळजबरी उकळले पैसे; तृतीयपंथ्याचा वेशधारी चोरट्यांना रंगेहाथ पकडले

जळगाव : तृतीय पंथीयांच्या वेशातील तीन भामट्यांनी वाटिकाश्रम परिसरातील एका घरात घुसून जबरी लूटीचा प्रयत्न केल्याची घटना रविवार (२५ सप्‍टेंबर) घडली. हा प्रकार शेजार्यांच्या लक्षात आल्याने तत्काळ तिघांना घरातच पकडून परिसरातील रहिवाश्यांनी बेदम झोडपून पोलिसांच्या  स्वाधीन केले 
अंगात साड्या घालून तृतीयपंथीयांचा मेकअप करुन तीन चेारट्यांनी रविवार सकाळी १० वाजेच्या सुमारास वाटिकाश्रम परिसरात अमावशा असल्याने भिक्षा मागत फिरत होते. एका घरात मुलगी एकटी असल्याची संधी साधत, तिघांपैकी एक घरात शिरला तर, दोघांनी बाहेर पाळत ठेवली. आत गेलेल्या भामट्याने मुलीचा गळा दाबून तिला घरातून पैसे आणायला लावले. मुलीने संधी मिळताच आरडाओरड केल्याने घाई गडबडीत तिघांनी पळ काढला.

पाकिट हिसकावून काढले हजार रूपये

पळून गेल्यावर शेजारच्या कॉलनीतील एका घरात घुसले. तेथेही एकाला पैसे मागितले. त्याने पैसे देण्यासाठी पाकीट हातात घेतले असता, तिघांनी त्याचे पाकिट हुसकावून बळजबरीने १ हजार रुपये काढून घेतले. तिघेही दमदाटी करून जबरी लुट करत असल्याचे समोर आल्यानंतर नागरिकांनी त्यांना पकडून बेदम चोप दिला. घटनेची माहिती तालुका पोलिसांना देऊन तिघांनाही पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e