राजेंद्रच्या तक्रारीनंतर सायबर सेल एक्सपर्टने या प्रकरणाची कसून चौकशी सुरू केली. हा तपास सुरू असताना आरोपी जामताडा येथे राहत असल्याचं समजलं. त्यानंतर पोलिसांनी जामताडाला जाऊन आरोपीला अटक केली.
शिक्षण इयत्ता आठवी पास… एकूण पाच भाषांवर कमांड… फक्त एक फोन करायचा. आपण क्रेडिट कार्ड डिपार्टमेंटचे अधिकारी आहोत असं सांगायचा. नंतर ग्राहकांना एक लिंक पाठवून त्यांच्याकडून ओटीपी मिळवायचा आणि ग्राहकाचं अकाऊंट खाली करायचा… बंगळुरूत राहणाऱ्या एका मिस्टर नटरवलालच्या या कारनाम्यामुळे बंगळुरूच नाही तर हैराण होते. अखेर या ठकसेनाला मध्यप्रदेशच्याच इंदौर पोलिसांनी अटक केली आहे. इंदौरच्या सायबर सेल पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. त्याने आतापर्यंत किती लोकांची फसवणूक केली याचाही तपास सुरू आहे. एका पीडित व्यक्तीच्या तक्रारीनंतर त्याला जामताडा येथून ताब्यात घेतलं आहे.
असताना आरोपी जामताडा येथे राहत असल्याचं समजलं. त्यानंतर पोलिसांनी जामताडाला जाऊन आरोपीला अटक केली. त्यानंतर त्याला इंदौरला आणण्या आलं. पोलिसांनी या आरोपीची कसून चौकशी केली असता त्याने आपलं नाव अतुल राणा असल्याचं सांगितलं. तो जामताडा येथील रहिवासी आहे. तो आठवी पास असून त्याला पाच भाषा येतात. त्याची अजूनही चौकशी सुरू असून आणखी काही फ्रॉडची माहिती उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मित्रांच्या मदतीने फसवणूक
आरोपी अतुल राणा हा खेडे गावात राहतो. बंगळुरूला जाऊन आपल्या मित्रांच्या मदतीने तो लोकांची फसवणूक करायचा. त्यामुळे त्याच्या मित्रांच्याही मुसक्या आवळण्याची सायबर पोलिसांनी तयारी सुरू केली आहे. तसेच त्यांनी आतापर्यंत कुणाकुणाला फसवलं, त्याचीही माहिती घेण्यात येत आहे.
0 Comments