परभणी मनसे शहराध्यक्ष सचिन पाटील यांच्या हत्येप्रकरणी एकाला अटक; नवी माहिती आली समोर

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे परभणी शहराध्यक्ष सचिन पाटील यांच्या हत्येने परभणीत  खळबळ उडाली होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष सचिन पाटील यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी आज, सोमवारी एकाला अटक केली आहे. विजय जाधव असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्याची कसून चौकशी केली जात आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे परभणी शहराध्यक्ष सचिन पाटील यांचा किरकोळ वादातून चाकूने वार करून हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली होती. सचिन पाटील आपल्या सहकाऱ्यांसह शिवराम नगरात बसलेले असताना त्यांचा काही जणांशी किरकोळ वाद झाला. या वादाचं रुपांतर हाणामारीत झालं आणि एका पदाधिकाऱ्यानं सचिन पाटील यांच्या मानेवर चाकूनं वार केले. या प्राणघातक हल्ल्यात सचिन पाटील गंभीर जखमी झाले.

सचिन पाटील यांच्यावर हल्ला झाल्यानंतर त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. पण रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणात झाल्यानं अखेर त्यांचा मृत्यू झाला. या घटनेतील आरोपी विजय जाधव हा लगेच फरार झाला होता. त्याच्या शोधासाठी पोलिसांकडून निरनिराळी पथके स्थापन करून शोध घेण्यात आला.

अखेर सात दिवसानंतर आरोपी पोलिसांच्या हाती लागला आहे. विशेष म्हणजे आज सकाळी मनसेकडून आरोपीला तात्काळ अटक करण्यासाठी धरणे आंदोलन आले होते. सचिन पाटील यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e