तहान लागल्याने विहिरीजवळ गेला अन् चिखलाने घात केला, शेतकऱ्याच्या पोरासोबत अनर्थ घडला

जळगाव: पाचोरा तालुक्यातील कळमसरा गावातील येथे विहिरीतून पाणी काढताना पाय घसरून पडल्याने एका शेतकरी कुटुंबातील तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी ११ वाजता ही घटना घडली. हरी राजू मोरे (वय २६, कळमसरा, ता.पाचोरा) असे मयत तरुण शेतकर्‍याचे नाव आहे. हरी मोरे हा सोमवारी सकाळी ११ वाजता शेतासाठी फवारणीसाठी आला होता. पाण्याची तहान लागल्याने हरी विहिरीजवळ गेला. याठिकाणी मात्र रात्रीच झालेल्या जोरदार पावसामुळे विहिरीच्या कठड्याजवळ चिखल झालेला होता.‍ विहिरीतून पाणी काढताना त्याचा पाय घसरला व तो विहिरीत पडला. 
प्रकार शेजारील शेतात काम करणार्‍यांच्या लक्षात येताच तरुणाला तत्काळ विहिरीतून बाहेर काढण्यात आले. मात्र तो पर्यंत उशीर झाला होता. त्यास तातडीने पाचोरा ग्रामीण रुग्णालयात हलविले असता वैद्यकीय अधिकारी डॉ.अमित साळुंखे यांनी हरी मोरे यास मयत घोषित केले. मयत हरीच्या पश्चात वृद्ध आई, वडिल, दोन भाऊ असा परिवार आहे. अतिशय मनमिळाऊ व हसमुख स्वभावाचा असलेल्या हरीच्या मृत्यूने कळमसरा परीसरात शोककळा पसरली. याबाबत पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e