औरंगाबाद : किराणा दुकानात बिस्किट आणि पाव आणण्यासाठी गेलेल्या पाच वर्षीय मुलीवर किराणा दुकानदारानेच अत्याचार केला. सदर खळबळजनक घटना औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील पाचोड पोलीस ठाणे हद्दीतील एका गावात घडली आहे.
एका गावातील पाच वर्षीय चिमुकलीला आईने दुकानात बिस्कीट व पाव घेण्यासाठी पाठविले. मुलगी दुकानात गेली असता दुकानात कोणी नसल्याचे पाहून दुकानदाराने मुलीवर अत्याचार केला. याप्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून पाचोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
आरोपीस पोलिसांनी केली अटक
लहान मुलीवर अत्याचार करणारा बळीराम असे नराधम आरोपीचे नाव आहे. या नराधमाला पोलिसांनी अटक केली असून त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे.
0 Comments