सहा जणांवर संशय, पोलिसांनी सापळा रचला; आरोपींकडे सापडलं २२ किलोंचं 'तरंगतं सोनं', पोलीस चकित

सिंधुदुर्ग: जिल्ह्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे. देवगड पवनचक्की परिसरात सापळा रचून सुमारे २२ कोटी ३७ लाख रुपयांच्या व्हेल माशाची उलटी सदृश पदार्थाची तस्करी करणाऱ्या ४ पुरुष आणि २ महिलांना मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दिनांक २२) रोजी देवगड पवनचक्की गार्डन परिसरात सापळा रचण्यात आला. यावेळी या भागात संशयास्पद वावरणाऱ्या ४ पुरुष आणि २ महिलांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे तपासणी करण्यात आली. त्यामध्ये त्यांच्याकडे २२ किलो ३७० ग्रॅम वजनाची व्हेल माशाची उलटी सदृश पदार्थ मिळून आला. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेच्या दाराप्रमाणे व्हेल माशाच्या या उलटी सदृश पदार्थाची किंमत २२ कोटी ३७ लाख रुपये इतकी असल्याचे स्पष्ट झालेले आहे.
या ६ आरोपींकडून व्हेल माशाची उलटी सदृश्य पदार्थासह एक चारचाकी आणि एक दुचाकी वाहन जप्त करण्यात आले आहे. तर, या संशयित आरोपींविरुद्ध देवगड पोलीस ठाण्यात भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम ३९,४२,४३, ४४, ४८, ५१ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. या गुन्हयाचा पुढील तपास देवगड पोलीस ठाण्याकडून करण्यात येत आहे.
कारवाईत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक संदिप भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र घाग, पोलीस हवालदार आशिष गंगावणे, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रकाश कदम, पोलीस हवालदार अनुपकुमार खंडे, अनिल धूरी, प्रमोद काळसेकर, रुपाली खानोलकर, पोलीस नाईक अमित तेली, संकेत खाइये, पोलीस कॉन्स्टेबल रवि इंगळे, प्रथमेश गावडे, यशवंत आरमारकर हे सहभागी झाले होते.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e