घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी लागलीच घटनास्थळी धाव घेत ट्रकला दोंडाईचा पोलिसांच्या ताब्यात दिले, मात्र चालक यावेळी फरार झाला आहे.
शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा जवळील रामी गावाचे लोकनियुक्त सरपंच कडू रेवजी भिल (वय 68) हे काल सायंकाळी उशिरा दोंडाईचा येथून बाजार करुन आपल्या घरी येत होते. दोंडाईचा रामी रस्त्यादरम्यान असलेल्या महादेव मंदिराजवळ दोंडाईचा कडून नंदुरबारच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या MH 18 BJ 6554 क्रमांकाच्या भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली.
यावेळी कडू भिल हे जोरदार धडकेने खाली कोसळल्याने त्यांना डोक्याच्या मागील बाजूस जोरदार मार लागला, यावेळी ट्रक चालकाने सरपंच यांना दूरपर्यंत चिरडून नेले आणि संधी साधत घटनास्थळावरून पळ काढला.
अपघाताच्या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दोंडाईचा आणि रामी गावातील नागरिकांनी धाव घेत संबंधित ट्रक चालकाचा पाठलाग सुरू केला. यावेळी धावडे गावाच्या पुढे नयन हॉटेलजवळ ट्रकला अडविले, मात्र ट्रक चालक या ठिकाणाहून फरार झाला. त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न गावकऱ्यांनी केला, मात्र तो मिळून आला नाही.
यावेळी गावकऱ्यांनी दोंडाईचा पोलिसांना घटनास्थळी बोलून ट्रक ताब्यात दिला यानंतर दोंडाईचा पोलिसांनी या अपघात प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. आणि या संदर्भात पुढील तपास पोलिस करीत आहे अशी माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.

0 Comments