एकनाथ खडसे यांच्या भाजपा प्रवेशाच्या ऐकीव बातम्या आहेत. गृहमंत्री अमित शाह यांनी आवश्यकता आणि नियोजनानुसार एकनाथ खडसे यांना वेळ दिली असेल, तर मी त्यावर काय भाष्य करणार? एकनाथ खडसे यांच्या भाजपा प्रवेशावर अमित शाह निर्णय घेतील. त्यांनी घेतलेला निर्णय हा भाजपाचा निर्णय असेल, अशी भूमिका आशिष शेलार यांनी मांडली.
दरम्यान, या चर्चेवर खुद्द एकनाथ खडसेंनी स्पष्टीकरण दिलं आहे. अमित शाह यांची भेट घेतल्याचं वृत्त खरं असल्याचं एकनाथ खडसे म्हणाले आहेत. पण असं बोलताना त्यांनी अप्रत्यक्षपणे देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला आहे. “अमित शाहांना एकदा भेटलो नाही याआधी पण भेटलो आहे. देवेंद्रजींनाही भेटलो आहे आणि या पुढेही भेटणार आहे. शाहांना भेटू नये असा नियम आहे का? हे जेव्हा गोधडीत होते तेव्हापासून माझे संबंध आहेत,” असे स्पष्टीकरण यापूर्वी खडसे यांनी दिले आहे.
0 Comments