अजनाडगाव ग्रामपंचायत हगणदारी मुक्त अभियान चा पुरवता बोजवारा

अजनाड/ प्रतिनिधी:(ओंकार जाधव)-  शिरपूर तालुक्यातील अजनाड ग्रामपंचायत अंतर्गत गेल्या अनेक वर्षांपासून शासनाने हगणदारी मुक्त गाव अभियान राबविण्यात अपेक्षेप्रमाणे काम झालेले दिसत नाही शासनाने हगणदारी मुक्त गाव अभियान राबविण्यासाठी प्रयत्न केला आहे संपूर्ण गाव हगणदारी मुक्त झाले पाहिजे परंतु  अजनाड ग्रामपंचायत अंतर्गत गावातील चार ही दिशांना घाणीचे साम्राज्य पसरले आहे संपूर्ण गाव रस्ता पायी चालणे लायक नाही शासनाने हगणदारी मुक्त गाव अभियान राबविण्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन करून देखील गावातील अर्धा किलोमीटर अंतरावर घाणीचे साम्राज्य पसरले दिसते स्थानिक पातळीवर  गावातील सरपंच ग्रामसेवक  ग्रामपंचायत सदस्य कोणत्याही प्रकारची कामे करत नसल्याने गावातील जनतेच्या आरोग्याची काळजी घेत नाही  गावातील शाळेत जाणाऱ्या शाळकरी मुलांना घाणीच्या रस्त्यावर चालत जावे लागत असल्याने त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी पुढील कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाहीत  तसेच स्थानिक पातळीवर गावातील जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी शासनाने हगणदारी मुक्त गाव अभियान यशस्वी होण्यासाठी स्वतःमध्ये काही बदल केले पाहिजेत असा आग्रह आहे संपूर्ण गाव हगणदारी मुक्त गाव कसं करावं हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे संपूर्ण भारतात ही योजना राबविण्यात अपेक्षेप्रमाणे काम झालेले आहे परंतु अजनाड गाव याबाबत वेगळे चित्र आहे  या योजना राबविण्यात स्थानिक पातळीवर गावातील सरपंच ग्रामसेवक ग्रामपंचायत सदस्य  का टाळाटाळ करीत याची शासन स्तरावर योग्य ती चौकशी करून तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ करीत आहेत

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e