मिळालेल्या माहितीनुसार, एक मुलं पळविणारा असल्याचं समजून एकाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. ही घटना नाशिकच्या वडाला गाव येथे घडली. एक प्रियकर आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी आला आणि स्थानिकांनी त्याला मुलं पळविणारा समजून बेदम मारहाण केली आहे. त्याला कारणही तसंच आहे, कारण हा प्रियकर आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी चक्क बुरखा परिधान करुन आला होता त्यामुळे हा व्यक्ती मुलं पळविणारा असल्याचा संशय स्थानिक नागरिकांना आला. त्यात सोशल मीडियावरील अफवेमुळे त्यांचा हा गैरसमज अधिकच वाढला आणि त्यांनी प्रियकराला चोर समजून बेदम मारहाण केली.
प्रियकराला चोर समजून स्थानिक नागरिक मारहाण करत होते. यावेळी मोठी गर्दी जमली होती. प्रियकराच्या सुदैवाने येथून पोलिसांची गाडी जात होती. जमलेली गर्दी पाहताच पोलिसांची याठिकाणी हस्तक्षेप केला आणि त्या जमावातून प्रियकराला बाहेर काढले. या प्रियकराची चौकशी केल्यानंतर हा संशयित आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी आला असल्याची माहिती उघड झाली. प्रेयसीला भेटण्यासाठी तरुणाने बुरखा परिधान केला होता. त्यामुळे तो मुलं पळविणारा असल्याचा संशय नागरिकांना आल्याने त्याला मारहाण करण्यात आली. दरम्यान मुलं पळविणाऱ्या टोळीची अफवा ही राज्यातील अनेक भागात पसरली आहे. मुलं चोर समजून मारहाणीच्या दोन घटना एकाच दिवसा
0 Comments