पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव खुर्द येथे सात वर्षीय मुलगी आपल्या आजीसह वस्तव्याला आहे. १० जून रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास आजी ह्या सातवर्षीय मुलीसोबत जळगाव खुर्द येथील तलाठी कार्यालयात कामानिमित्त आल्या होत्या. तलाठी कार्यालयात तलाठी मॅडम नसल्यामुळे आजी ह्या नातीसोबत थोडा वेळ थांबल्या. नंतर मुलीला तहान लागल्याने तिला कार्यालयात बसवून आजी कार्यालयाबाहेर असलेल्या नळावर पाणी घेण्यासाठी गेल्या.
याचदरम्यान तलाठी कार्यालयातील शिपाई भैय्या (पुर्ण नाव माहित नाही) याने मुलीची चड्डी काढून तिचा विनयभंग केला. मुलगी ही रडत रडत आजी कडे धावत आली. आजीने नातीला नेमकं काय झाल विचारल्यावर, तिने शिपाई याच्याकडे बोट दाखवित त्याने माझी चड्डी ओढल्याचे नातीने आजीला सांगितले
0 Comments