भिवंडीतील नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मदन बल्लाळ यांनी सांगितले की, आई गाढ झोपेत असताना आरोपी मुलाने तिच्यावर हल्ला केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अमरावती यादव (५८) घरात झोपली होती. त्यावेळी आरोपी आणि त्याच्या चुलत बहिणीने तिच्या खोलीत प्रवेश केला. बेल्टने गळा दाबून तिची हत्या केली. त्यानंतर त्यांनी महिलेचा मृतदेह खोलीच्या कपाटात ठेवला.
त्यानंतर आरोपीने इमारतीच्या बाहेर उडी मारली आणि त्याच्या चुलत बहिणीला मृतदेह इमारतीबाहेर फेकण्यास सांगितले. दरम्यान, त्याचे वडील घटनास्थळी आले. त्यामुळे आरोपीने बेशुद्ध पडल्याचे नाटक केले. त्याचे वडील आणि लहान भावाने आईचा मृतदेह पुन्हा घरात आणला. जेव्हा आरोपीच्या वडिलांनी त्याला या घटनेबद्दल विचारले तेव्हा त्याने सांगितले की चोरांच्या टोळीने त्यांना मारहाण करुन लुटले. चोरट्यांनी आईवर हल्ला केल्याने तिला प्राण गमवावे लागले, असा कांगावा आरोपीने केला.
काल्हेर येथे राहणाऱ्या एका ५८ वर्षीय महिलेला मंगळवारी सकाळी चोरट्यांनी मारहाण केल्याचा फोन पोलिस नियंत्रण कक्षाला आला. नारपोली पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. तोपर्यंत तिचा मृतदेह घरात ठेवलेला होता." अशी माहिती पोलिसांनी दिली.
आमच्या पथकाने मृतदेहाची तपासणी केली असता मृतदेहाच्या गळ्यावर जखमेच्या खुणा दिसून आल्या. कपाळावर मारहाणीच्या खुणाही होत्या. पोलिसांनी कृष्णा यादव याच्याकडे चौकशी केली असता त्याने सांगितले की, इमारतीजवळ तीन ते चार जण त्याला मारहाण करून लुटण्यासाठी आले असता आईची हत्या करण्यात आली.
पोलिसांना आरोपीचा दावा संशयास्पद वाटला. त्यामुळे त्यांनी स्थानिकांकडून माहिती घेण्यास सुरुवात केली असता कृष्णा यादव याचे चुलत बहीण बबिता पल्टुराम यादव हिच्याशी अनैतिक संबंध असल्याचे आढळून आले. नंतर त्याने बहिणीच्या मदतीने आईची हत्या केल्याची कबुली दिली.
पोलिसांना आरोपीचा दावा संशयास्पद वाटला. त्यामुळे त्यांनी स्थानिकांकडून माहिती घेण्यास सुरुवात केली असता कृष्णा यादव याचे चुलत बहीण बबिता पल्टुराम यादव हिच्याशी अनैतिक संबंध असल्याचे आढळून आले. नंतर त्याने बहिणीच्या मदतीने आईची हत्या केल्याची कबुली दिली.
0 Comments