पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार : पाववा आखाडे याने त्याचे साथीदार गोविंदा सामुद्रे, मुकेश ठाकरे, दिपक ठाकरे, विकास ऊर्फ नागू ठाकरे, बाँबी बैसाने (सर्व राहणार नंदुरबार) यांनी घटनेच्या दोन दिवसापुर्वी कट रचून धुळे येथील मनोज पारेराव याच्या सांगण्यावरून सत्तार मेंटल, वसिम बाटला, बापू, पप्पू व अनोळखी एक इसम (सर्व राहणार धुळे) असे सर्वांनी मिळून हा गुन्हा केल्याचे सांगितले.
नंदुरबार येथील गोविंदा सामुद्रे, मुकेश ठाकरे, दीपक, विकास ऊर्फ नागू ठाकरे, बॉबी बैसाणे यांचा शोध घेतला असता ते बदलापूर येथे पळून गेल्याचे समजून आल्याने स्थानिक गुन्हेचे एक पथक तात्तकाळ बदलापूरात रवाना झाले. तेथे त्यांनी बुधवारी स्थानिक पोलीसांच्या मदतीनं गोविंदा यशवंत सामुद्रे, मुकेश शामा ठाकरे, विकास ऊर्फ नागू अशोक ठाकरे (तिन्ही रा. चिंचपाडा मिलाटी, नंदुरबार) तसेच विश्वजीत ऊर्फ बॉबी संजय बैसाणे (वय 24 रा. समता नगर, नंदुरबार) यांना ताब्यात घेतलं. त्यांना स्थानिक गुन्हे शाखा येथे आणून तपास केला असता त्यांनी गुन्हा केल्याचे कबुल केल्याचे पाेलिसांनी सांगितलं.
दरम्यान ताब्यात घेण्यात आलेल्या सर्व संशयित आरोपीतां गुन्ह्याच्या पुढील तपासकामी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. तसंच त्यांनी आणखी काही गुन्हे केले आहेत का ? याबाबत तपास करीत आहोत असेही पाेलिस दलानं नमूद केले.
नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, नंदुरबार विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार, स्थानिक गुन्हे शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस हवालदार महेंद्र नगराळे, राकेश बसावे, पोलीस नाईक विशाल नागरे, मोहन इमढेरे, राकेश मोरे, मनोज नाईक, सुनिल पाडवी, पोलीस कॉन्सटेबल अभय राजपुत, आनंदा मराठे राजेंद्र काटके, अभिमन्यु गावीत, रामेश्वर चाण यांच्या पथकाने ही कामगिरी बजावली.
0 Comments