सैराट' मधील 'त्या' कलाकारास पाेलिसांनी घेतलं ताब्यात

सैराट चित्रपटातील कलाकार सुरज पवार  यास पोलीसांनी आज ताब्यात घेतलं आहे. मंत्रालयात नोकरी लावून देण्याचं आमीष देवून पैशाची लुट प्रकरणाचा तपास राहूरी पाेलीस करीत आहेत. त्याअनुषंगाने सुरज पवारची चाैकशी करण्यासाठी त्याला पाेलिसांनी  ताब्यात घेतले आहे.
मंत्रालयात नोकरीला लावून देतो असे आमीष दाखवून  जिल्ह्यातील एका सुशिक्षित बेरोजगार तरुणाची लाखों रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी तीन संशयित आरोपींच्या नुकत्याच मुसक्या आवळल्या आहेत. फसवणुकीसाठी त्यांनी राजमुद्रेचा देखील गैरवापर केल्याच समाेर आलं हाेते.
प्रकरणातील धक्कादायक म्हणजे सैराट चित्रपटातील प्रिन्स अर्थात अभिनेता सुरज पवार याचे देखील नाव समोर आले हाेते. त्यामुळं पोलीसांनी या प्रकरणाचा कसून तपास केला. आज पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी सूरज पवार यास चौकशीसाठी ताब्यात घेतलं. दरम्यान या चाैकशीनंतर गुन्हात सहभाग आढळल्यास सुरज पवारला अटक ही हाेऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e