चंद्रपूर : जिल्ह्यातील वरोरा शहराजवळ असलेल्या बोर्डा गावात धक्कादायक घटना घडल्याने खळबळ माजली आहे. संजय कांबळे यांनी त्यांच्या दोन्ही मुलांना पाजून त्यांची हत्या केलीय. सुमित संजय कांबळे (७) आणि मिस्टी संजय कांबळे (३) अशी मृत पावलेल्या मुलांची नावं आहे. या गंभीर घटनेमुळं संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, मुलांची हत्या केल्यानंतर आरोपी फरार झाला आहे. वरोरा पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत असून आरोपीचा शोध घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कांबळे परिवार बोर्डा या गावातील रहिवासी आहेत. संजय श्रीराम कांबळे शिकवणी वर्ग घेण्याचे काम करत होता. कोरोना काळापासून त्याची मानसिक परिस्थिती ढासळल्याने शिकवणी वर्ग बंद होते. तर संजय यांची पत्नी कॉलेजमध्ये कंत्राटी तत्वावर काम करते. संजयने त्यांच्या दोन्ही मुलांना विष देऊन हत्या केली.
त्यानंतर मुलांची आई घरी आल्यानंतर तिला दोन्ही मुलं बेडवर पडून असल्याचे दिसले. ही धक्कादायक घटना पाहताच मुलांच्या आईने आरडाओरडा सुरु केला. त्यानंतर शेजारील नागरिकांना दोन्ही मुलांना उपजिल्हा रुग्णालयात नेले. परंतु, उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाला होता.
0 Comments