मिळालेल्या माहितीनुसार, विवाहित तरुणीचा सासरच्यांकडून वारंवार शारीरिक आणि मानसिक त्रास देण्यात येण्यात येत होता. तसचे काही दिवसांपूर्वी विवाहितेच्या आईला घरी बोलावून अपमानित केल्याचा धक्का तिला सहन न झाल्याने तिने टोकाचे पाऊल उचलले असल्याचे सांगण्यात आले आहे. हर्षदा तरंगे असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.
हर्षदा यांनी २०२० मध्ये हेमंत तरंगे यांच्यासोबत लग्न केले. हर्षदा ही लग्नापासून कोपरखैरणे सेक्टर १८ येथील सासरी राहायला होती. सासरच्यांकडून विवाहितेचा वारंवार छळ करण्यात येत असल्याने या आत्महत्येस कारणीभूत असलेल्या सासरच्यांविरोधात विवाहितेची आई वैशाली वाघमोडे यांनी तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी पती हेमंत तरंगे, सासू मिताली तरंगे, सासरे अण्णासो, नणंद दीपाली मदने आणि धीर धवल तरंगे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पती हेमंत याला पोलिसांनी अटक केली आहे.
0 Comments