पेठशिवानी येथील शितल बापूराव मामीलवाड या ६ सप्टेंबर रोजी घरकाम करत असताना त्यांना सापाने अचानक चावा घेतला. ही बाबा त्यांच्या लक्षात आल्याने नातेवाईकांनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र साप विषारी असल्याने शितल यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे मामीलवाड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मृत शितल मामीलवाड यांचं काही वर्षांपूर्वीच लग्न झालं होतं. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, सासू, दीर असा मोठा परिवार आहे. या घटनेमुळे पेठशिवानी गावामध्ये हळहळ वेक्त केली जात आहे.
सर्पदंशाने मृत्यू होण्याच्या घटना वाढल्या
यंदा पाऊस चांगला असल्याने शेतकऱ्यांनी पेरणी केली असून पिके देखील जोमात आहेत. त्यामुळे शेतकरी शेती कामात व्यग्र आहेत. अशातच शेतामध्ये काम करताना शेतकऱ्यांना सर्पदंश होण्याच्या घटना जिल्ह्यामध्ये वाढल्या आहेत. सर्पदंश झाल्यामुळे अनेकांचा मृत्यू झाल्याचा घटना घडल्या असल्याने शेतकऱ्यांनी काळजी घेणे गरजेचं झालं आहे.

0 Comments