अखेर आईला सांगितला संपुर्ण प्रकार
दरम्यान 13 रोजी पीडितेची आई बकऱ्या चारण्यासाठी शेत शिवारात गेली होती. या दरम्यान नराधम बापाने पीडितेस अंगावरील कपडे काढ व जवळ बसुन मोबाईलवरील अश्लील व्हिडिओ पहा असे सांगितले. परंतु पिडीत बालिकेने नकार दिल्याने नराधम बाप शिवराळ भाषेत बोलत घराबाहेर निघून गेला. त्यामुळे पिडीत बालिका घाबरली व ती घरात रडत बसली. पिडीतेची आई बकऱ्या घेऊन घरी आल्यानंतर पिडीतेला जास्तच रडू आले व ती आईला मिठी मारत हूंदके देऊ लागली. तेव्हा आईने मुलीला रडण्याचे कारण विचारले. पिडीतेने स्वतः सोबत बापाने केलेला किळसवाणा प्रकार कथन केला. त्यामुळे पिडीतेची आई भयभीत झाली तिने आपल्या भाऊ व आईला बोलावून घेत सारा प्रकार सांगितला. यानंतर त्यांचे सोबत बापाने केलेला किळसवाणा प्रकार कथन केला. त्यामुळे पिडीतेची आई भयभीत झाली तिने आपल्या भाऊ व आईला बोलावून घेत सारा प्रकार सांगितला. यानंतर त्यांचे सोबत पोलीस स्टेशनला येऊन पती विरूध्द पाचोरा पोलिसात तक्रार दिली. त्याआधारे पोलिसांनी विनयभंग, धमकावणे व पोस्को अंतर्गत नराधम पित्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यास अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपअधीक्षक भारत काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील करीत आहेत.
0 Comments