धुळे, नंदुरबार जळगाव या जिल्ह्यांमधून या दोघा जणांनी गुंतवणूकदारांना मोठ्या प्रमाणात परतावा मिळण्याच्या आमिषाने गुंतवणूक करण्यास भाग पाडले. यामध्ये जवळपास 35 गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले असून त्यांची जवळपास 17 कोटी रुपयांची फसवणूक झाली असल्याचे उघडकीस आले आहे.
गुजरातमध्ये बनावट कंपन्या
फसवणूकदारांकडून गुजरात व सुरत या ठिकाणी चार बनावट कंपन्या स्थापन करण्यात आल्या होत्या. या कंपन्यांच्या नावाखाली गुंतवणूकदारांना परताव्याचे आमीष दाखविण्यात येत होते. या संदर्भात दोंडाईचा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने तपासाची चक्र फिरवली. यानंतर धुळे जिल्ह्यातील दोघांच्या आर्थिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या. पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीने करण्यात येत आहे
0 Comments