पोलीसांनी दिलेली माहिती आणि ग्रामीण प्रशासनाने निरिक्षक खगेंद्र टेंबेकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार प्रशासकीय कार्यालयातील मुंबई पोलिस दलात कार्यरत असलेल्या शिपायाचा नाशिक ग्रामीण दलात बदली करण्यासाठी अर्ज आला होता. याअर्जासोबत जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करण्यात आले होते. पोलीस शिपायाच्या नमुद आजाराबाबत संशय व्यक्त करण्यात आला होता. त्यानंतर सदर वैद्यकीय प्रमाणपत्राची पडताळणी केली असता जिल्हा रुग्णालयातून वैद्यकीय प्रमाणपत्र दिल्याचे समोर आले. चौकशीत तत्कालीन सिव्हिल सर्जन आणि चौकशीत तत्कालीन सिव्हिल सर्जन आणि अतिरिक्त शल्यचिकित्सक यांच्या सह्या असल्याचे निष्पन्न झाले आहे.
दरम्यान, प्रमाणपत्र रुग्णालयाचा लिफ्टमॅनने बनवून देत त्यावर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सह्या घेतल्याचे समोर आले आहे. तालुका पोलिसांनी संशय लिपीक हिरा कनोज यांना पाच दिवसांपूर्वी अटक केली. तर सिव्हिलचे कर्मचारी कांतीलाल गांगुर्डे यांना मंगळवारी रात्री अटक करण्यात आली. आज न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांच्या पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. सदर घटनेने आरोग्य एकच खळबळ उडाली आहे.
0 Comments