भरधाव ट्रकच्या धडकेत महिलेचा दुर्दैवी मृत्यू; संतप्त जमावाने केली १० ट्रकची जाळपोळ

गडचिरोलीतून एटापल्ली तालुक्यातून धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. एटापल्ली तालुक्यातील सुरजागड लोह प्रकल्पातून कच्च्या मालाची वाहतूक करणाऱ्या ट्रकने महिलेला धडक दिली. यात महिला जागीच ठार झाली आहे. त्यामुळे संतप्त जमावाने ८ ते १० ट्रक पेटवून दिल्याची घटना मंगळवारी सायंकाळच्या सुमारास मूलचेरा तालुक्यातील शांतीग्राम येथे घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरजागड लोह प्रकल्पातून कच्च्या मालाची वाहतूक करणाऱ्या ट्रकने महिलेला धडक दिली. यात महिला जागीच ठार झाली. त्यामुळे संतप्त जमावाने ८ ते १० ट्रक पेटवून दिले. मूलचेरा तालुक्यातील शांतीग्राम येथे घडली आहे. त्यामुळे सुरजागड लोह प्रकल्पबाबत असंतोष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. मृतक महिलेचे नाव अद्याप समजले नाही. पतीसोबत दुचाकीने महिलेला  ट्रकने धडक दिली.

नेमकं काय घडलं ?

भरधाव वेगाने जात असलेल्या ट्रकने दुचाकीला धडक दिली. ट्रकच्या धडकेत यात पती जखमी तर पत्नी जागीच ठार झाली. त्यामुळे संतप्त जमावाने रस्त्यावर उभे असलेले ट्रक पेटवून दिले. सुरजागड लोह प्रकल्पातून अवजड ट्रक धावत असल्याने पर्यायी रस्ता तयार करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी अनेकदा केली. मात्र याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले. अहेरी-अल्लापल्ली येथील व्यापाऱ्यांनी बाजारपेठ बंद ठेवून पर्यायी रस्त्यासाठी आंदोलन केले. तरीही प्रशासनाने दुर्लक्ष केले. आज अपघात घडताच संतप्त नागरिकांनी तब्बल आठ ते दहा ट्रकांना आग लावून दिले.

जमावाने ट्रक पेटवून दिल्यामुळे सुरजागड लोह प्रकल्पाचे मोठे नुकसान झाले आहे. या आधी देखील एटापल्ली लगतच्या गुरुपली येथे भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला धडक दिली. तेव्हा सुद्धा संतप्त नागरिकांनी आठ ते दहा ट्रक पेटवले होते. त्यानंतर तब्बल दोन अडीच वर्ष प्रकल्पाचे काम बंद पडले होते. सुरजागड प्रकल्पातील अवजड वाहनांमुळे स्थानिक नागरिकांना प्रचंड धुळीचा सामना करावा लागतो.त्यामुळे या प्रकल्पाला अहेरी उपविभागातील अनेक गावांचा प्रचंड विरोध आहे.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e