जळगाव: सावत्र आई चांगली वागणूक देत नाही, २५ वर्षीय मुलाने जे केलं त्याने अख्खं गाव सुन्न

जळगाव: तालुक्यातील गलंगी येथील तरूणाने सावत्र आईच्या डोक्यात लाकडी दांडा टाकून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सहाबाई शिवराम बारेला (वय-४५, गलंगी, ता.चोपडा) असे मयत महिलेचे नाव आहे. तर तिचा खून करणाऱ्या दीपक मगन बारेला (वय-२५ ) या मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, दीपक बारेला हा सावत्र आई सहाबाई बारेला यांच्यासोबत राहतो. सावत्र आई ही चांगली वागणूक देत नसल्याने दीपक कंटाळला होता. रविवारी रात्री दीपक व त्याची सावत्र आई या दोघांमध्ये वाद झाला होता. या वादात संतापाच्या भरात दिपकने सावत्रआईच्या डोक्यात लाकडी दांडा मारला. यात तिचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर चोपडा शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अवतारसिंग चव्हाण, उपनिरीक्षक अमर वसावे व सहकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेत नेमका प्रकार जाणून घेतला. मयत महिलेचा संशयीत मुलगा यास चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले. या घटनेबाबत अद्याप पेालीसात कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. अशी माहिती मिळाली आहे.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e