गोंदीया जिल्ह्यातील त्‍या मुख्याध्यापकाला निलंबीत करण्याचे आदेश; वाहनात मुलांना कोंबून नेल्‍याचे कारण

नंदुरबार : आदिवासी विकास विभाग शासकीय आश्रमशाळा मजितपुर (जि. गोंदिया) प्रकरणी मुख्याध्यापकाला निलंबीत करण्याचे आदेश आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिले आहेत. क्रिडा स्पर्धांसाठी मुलांना एकाच वाहनात कोंबुन नेल्‍याप्रकरणी ही कारवाई केली आहे. 
गोंदीया जिल्ह्यातील आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रम शाळा  मजितपुर येथील आदिवासी विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धांसाठी एका वाहनात कोंबुन नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. यातील काही मुले प्रवासा दरम्यान बेशुद्ध देखील झाल्याचे निदर्शनास आले होते. या प्रकरणी आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावितांनी नाराजी व्यक्त करत या शाळेच्या मुख्याध्यापला निलंबीत करण्याचे आदेश दिले आहे.

विद्यार्थ्यांना असे नेणे चुकीचे

विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने घेवुन जाणे चुकीचे असुन अशा प्रकार पुन्हा खपवुन घेतला जाणार नसल्याचे संकेत देत या प्रकरणी कठोर कारवाईचे निर्देश आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावितांनी दिले आहे.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e