दिलीप रंगनाथ कदम(वय 51, रा. माळीगल्ली, वडाळागाव, नाशिक असे मृताचे नाव आहे. तर त्याची पत्नी लक्ष्मी कदम (42, मूळ रा. येवला, जि. नाशिक)हिचा शाेध पोलिसांकडून सुरु करण्यात आला आहे. पाेलिसांच्या माहितीनुसार कदम कुटुंब माळीगल्लीत वास्तव्यास आहे. त्यातील दिलीप हे पंचवटीतील गणेशवाडीत गॅरेज मॅकेनिक असून त्यांना राेशन हा मुलगा आहे
शनिवारी दिलीप यांच्या घरातून उग्र वास येत हाेता. शेजारी राहणाऱ्या लोकांनी याबाबद पोलिसांना माहिती दिली. पाेलिसांना माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर घराची पाहणी करताच दिलीप यांचा मृतदेह दाेरीने हातपाय बांधून पाेटावर वार केलेल्या अवस्थेत आढळला. दिलीप यांची दुसरी पत्नी लक्ष्मी ही पसार असून तिने तिच्या साथीदारांसह ही हत्या केली का याचा शोध आता पोलिसांकडून करण्यात येत आहे. त्यानुसार तिचा येवला व अन्य भागात शाेध घेतला जात आहे.दरम्यान या बाबत इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल आहे
0 Comments