इन्स्टाग्रामवर बनावट खाते करून तरुणीची बदनामी

जळगाव : इन्स्टाग्रामवर बनावट खाते तयार करून प्राध्यापक तरुणीच्या ओळखीच्या व्यक्तींना अश्लील छायाचित्र पाठवून बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत शनिवारी (ता. २५) जळगाव सायबर पोलिसात  अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. 
जळगाव  सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बोदवड शहरातील २४ वर्षीय प्राध्यापिका तरुणी कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. १० ते २४ सप्टेंबरदरम्यान अज्ञात व्यक्तीने या तरुणीच्या नावाने इन्स्टाग्रामवर  बनावट खाते तयार केले. यानंतर तिच्या ओळखीच्या लोकांना व मित्रांना रिक्वेस्ट पाठवून तिची बदनामी व्हावी; यासाठी  बनावट खात्याच्या स्टेटसवर महिला व पुरुषांचे अश्लील छायाचित्र ठेवून बदनामी केल्याचा प्रकार समोर आला.

अज्ञाताविरूद्ध गुन्‍हा दाखल

सदर प्रकार लक्षात आल्यानंतर तरुणीने शनिवारी जळगाव सायबर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून सायंकाळी पाचला अज्ञात व्यक्तीविरोधात जळगाव सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक दिलीप भागवत तपास करीत आहेत.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e