हिंगणा : एकमेकांवर जीवापाड प्रेम करायचे पण घरचे नातेवाईक आणि समाज काय म्हणेल याचा विचार मनात आला. नातं आड आलं आणि प्रेमाचा भयानक शेवट झाला. शेवटच्या श्वासापर्यंत एकमेकांची साथ सोडणार नाही असं वचन दिलेल्या प्रेमीयुगुलाने एक्स्प्रेसखाली आपलं आयुष्य संपवलं. फुलत जाणाऱ्या प्रेमाचा एवढा वाईट शेवट होईल असा विचार त्या दोघांनीही स्वप्नात केला नव्हता. मात्र परिस्थिती अशी आली की त्यांनी टोकाचं पाऊल उचललं.
प्रेमीयुगुलाने संपवलं
एकमेकांवर जीवतोडून प्रेम करणाऱ्या प्रेमीयुगुलाने हावडा-नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेसखाली आत्महत्या केली आहे. ही धक्कादायक घटना खापरी इथे घडली. धावत्या एक्स्प्रेससमोर उडी घेऊन त्यांनी प्रेमाचा आणि आयुष्याचा शेवट केला. त्या दोघांचीही ओळख पटली असून पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले आहेत.
जितेंद्र नेवारे या नावाच्या तरुणाचं आपल्या मावस बहिणीवर प्रेम होतं. त्याचं लग्न झालं होतं. तो ड्रायव्हर म्हणून काम करायचा. बायको त्याला सोडून माहेरी निघून गेली. बायको माहेरी गेल्यानं तो आईसोबत एकटाच राहायचा. मावस बहिणीचं वरचेवर येणं जाणं होत असायचं. त्यातून एकमेकांना आवडू लागले आणि मग प्रेम झालं.
दोघांनाही लग्न करायचं होतं. नातं विसरले आणि एकमेकांसोबत 7 जन्म एकत्र राहण्याचं वचन त्यांनी घेतलं, पण नातेवाई आणि समाज आपल्याला स्वीकारणार नाहीत. एकमेकांशिवाय राहू शकत नाही समाज स्वीकारणार नाही म्हणून मग या दोघांनी टोकाचं पाऊल उचललं.
जितेंद्र आपल्या मावस बहिणीला भेटायला गोंदियाला गेला. त्यानंतर ती त्याला भेटण्यासाठी नागपूरला आली. दोघांनी दिवसभर एकमेकांसोबत वेळ घालवला. त्यांनंतर रात्री 8 वाजण्याच्या सुमारास दोघांचे मृतदेह रेल्वेच्या रुळावर आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी त्यांचा मृदेह ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली.
पोलिसांनी असा लावला छडा
पोलिसांना घटनास्थळावरून तुटलेले फोन मिळाले आहेत. त्यांनी या फोनची पूर्ण तपासणी केली. सायबर सेलच्या मदतीने हा सगळा प्रकार उघडकीस आला. त्यातून जितेंद्रचा नंबर मिळाला. यामुळे पोलिसांना त्याचं घर गाठणं शक्य झालं. त्यांनी घर गाठून घडलेला प्रकार आईला सांगितला. यावेळी आईने फोन नॉट रिचेबल लागत असल्याचे पोलिसांना माहिती दिली.
0 Comments