मिळालेल्या माहितीनुसार, मृत पावलेली तरुणी वायगाव येथील कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती. या तरुणीसोबत गोपाळ नावाचा युवक बोलण्याचा आग्रह धरायचा. परंतु, तरुणीने नकार दिल्यावर मोबाईलवरून फोटो व्हायरल करण्याची धमकी द्यायचा. त्यानंतर तरुणीने या प्रकाराबाबत आईला सांगितल्यावर त्या युवकाला समजावण्याचा प्रयत्नही केला.
मात्र, ३१ ऑगस्ट रोजी गोपालने तरुणीच्या काकाला पुतणीसोबत लग्न लावून देण्याबाबत सांगितलं. लग्न जुळवून नाही दिले पुतणीला पळवून नेईल, अशी धमकी दिली होती. त्यानंतर ३१ ऑगस्टला सायंकाळी तरुणी घराबोहेर गेली पण घरी परतलीच नाही. त्यानंतर या तरुणीचा मृतदेह २ सप्टेंबरला विहिरीत आढळला. या धक्कादायक घटनेबाबत तरुणीच्या आईला कळताच गोपाल विरोधात हत्येची तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी गोपाल विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला.
या घटनेमुळं जिल्हा सामान्य रुग्णालयात बराच वेळ वातावरण तणावपूर्ण होतं.जिल्हा सामान्य रुग्णालयात मोठी गर्दी उसळली होती.आरोपीवर गुन्हा दाखल करत नातेवाईकांनी कारवाईची मागणी केली होती.खासदार रामदास तडस यांनीही रुग्णालयात भेट देत पीडित तरुणीच्या कुटुंबीयांशी या प्रकरणी चर्चा केली. दरम्यान, जिल्हा सामान्य रुग्णालयात डॉक्टरांनी मृतदेहाचं शवविच्छेदन केलयं.सध्या पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केलाय.पोलिसांच्या तपासात काय बाबी पुढं येतात,याकडं सर्वांचं लक्ष लागलंय, अशी माहिती खासदार रामदास तडस यांनी दिली.
0 Comments