माेबाईल दुरुस्त करताना झाला स्फाेट, ग्राहकानं मागितले दहा हजार अन्....

 : शहदा  शहरातील पालिकेसमोर असलेल्या एका मोबाईलच्या  दुकानात ग्राहकाने दुरुस्तीसाठी आणलेल्या मोबाईल फोनचा स्फाेट झाला. यामुळं दुकानासह  परिसरात एकच खळबळ उडाली. दरम्यान ग्राहकानं दुकान मालकास दहा हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी केल्याने काही काळ दुकानात गाेंधळ निर्माण झाला 
टनेबाबत अधिक माहिती अशी : शहरातील एका मोबाईल दुकानात नागरिकाने दुरुस्तीसाठी त्याचा माेबाईल नेला हाेता. संबंधित दुकान मालकाने सॉफ्टवेअर रिसेट मारून देत सांगत मोबाईलचं बटन सुरू करताच त्याचा स्फोट झाला. तसेच त्यास आग लागली.

दरम्यान मोबाईलच्या स्फोटमुळे दुकान मालक व परिसरातील नागरिकांची एकच धावपळ उडाली. बराच वेळ मोबाईल जळत राहिला अखेर पाणी टाकल्यावर मोबाईल कसा बसा विझल्याने दुकान मालकाने सुटकेचा निःश्वास टाकला.

दरम्यान दुरुस्त करण्यासाठी आणलेल्या ग्राहकाने माझा मोबाईल जाळून टाकला असून मला दहा हजार रुपये भरपाई द्यावी अशी मागणी केली. यामुळे दुकान मालकाची चांगलीच भांबेरी उडाली. सॉफ्टवेअर दुरुस्तीसाठी दोनशे रुपयांचा खर्च सांगितला होता. दरम्यान मोबाईल स्फोट होऊन जळून गेला तर मी कुठून दहा हजार रुपये देऊ असे दुकान मालकाने नमूद केले. यामुळे काही काऴ दुकानात गाेंधळ निर्माण झाला.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e