५० खोके एकदम ओके म्हणत मंत्री दादा भुसेंच्या कार्यक्रमात शेतकऱ्यांचा राडा

धुळे : विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी मंत्री दादा भुसे हे आज धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या पहिल्याच दौऱ्यादरम्यान कांदा उत्पादक शेतकरी चांगलेच आक्रमक झाले होते. साक्री तालुक्यातील कासारे गावात शेतकऱ्यांनी मंत्री दादा भुसे  समोरच 'पन्नास खोके एकदम ओके'च्या घोषणा दिल्या.
धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातल्या कासारे गावात विविध विकास कामांच्या उद्घाटना निमित्ताने बंदरे व खणीकर्म मंत्री दादा भुसे यांना आपल्या पहिल्याच दौऱ्यादरम्यान शेतकऱ्यांच्या विरोधाला सामोरे जावे लागले. यावेळेस कासारे गावात मंत्री दादा भुसे आल्यानंतर संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवत आपला रोष व्यक्त केला.
कांद्याला भाव मिळत नाही, साक्री तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर होत नाही. यामुळे आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी हे आक्रमक आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी '५० खोके... मंत्री ओके ...' अशा जोरदार घोषणाही दिल्या. पोलिसांनी आंदोलक शेतकऱ्यांना बाजूला हटवण्याचा प्रयत्न केला. तर मंत्री दादा भुसे यांनी शेतकऱ्यांची समजूत घालून त्यांचं म्हणणं ऐकण्याचा प्रयत्न केला. मात्र आक्रमक झालेल्या आंदोलक शेतकरी मंत्री दादा भुसे यांचे ऐकून घेण्याच्या मानसिकतेत नव्हते.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e