आयएमईआय नंबर बदलून मोबाईल विक्री; टोळीचा पर्दाफाश, ४२ मोबाईल हस्‍तगत

 बीड : चोरलेल्या मोबाईलचा आयएमईआय नंबर बदलून तो दुकानदारा मार्फत ग्राहकांना विक्री करणार्‍या टोळीचा बीड  पोलिसांनी पर्दाफाश केलाय. यावेळी नंबर बदलणार्‍यासह दुकानदार आणि दलाल अशा 4 जणांच्या टोळीला पोलिसांनी  ताब्यात घेतले आहे. यावेळी त्यांच्याकडून 42 मोबाईलसह 4 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई रात्री बीड शहरातील पेठ बीड पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली. 

मोहसीन खान रफिक खान (रा. बीड) हा चोरीचे  मोबाईल विकत घेऊन त्याचा आयएमईआय नंबर घरी बदलत होता. ते नंबर बदलून फारुक युसुफ पठाण (रा. पेठ बीड), शेख आफरोज शेख नजीर (रा. भालदारपुरा, बीड) यांच्यामार्फत दुकानदारांना देत होता. याची माहिती पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या मिळाली. यानंतर त्यांनी पोलिसांना पाठवून त्याठिकाणी छापा टाकला.

४ लाखाचा मुद्देमाल जप्‍त

पोलिसांनी केलेल्‍या कारवाईत 4 आरोपींसह 42 मोबाईल, लॅपटॉप असा 4 लाख 13 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यामुळे आता मोबाईल चोरांची मोठी टोळी पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.


Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e