नवी दिल्ली: पुद्दुचेरीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका आईसाठी आपलं मूल जितकं प्रिय असतं तितकंच दुसऱ्याचं मूलही असतं, पण पुडुचेरीच्या कराईकलमध्ये वर्गात एक मुलगा आपल्या मुलाच्या पुढे गेल्याचं एका आईला इतकं वाईट वाटलं की तिने त्या १३ वर्षाच्या निष्पाप मुलाचा जीव घेतला.
मिळालेल्या माहितीमुसार, कराईकलमध्ये एका महिलेने आपल्या मुलाला प्रथम आणण्यासाठी तिच्या वर्गातील १३ वर्षांच्या मुलाला विष दिले. १३ वर्षीय बाला मणिगंदन असं या मुालाच नाव आहे. या मुलाला शनिवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
मात्र, त्याला वाचवण्यात अपयश आले. मुलाच्या पालकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून वर्गमित्रात्र्या आईला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाला कराईकल येथील एका इंग्रजी शाळेत आठवीतील वर्गात शिकत होता. तो राजेंद्रन आणि मालती यांचा दुसरा मुलगा होता. शाळेत वार्षिक कार्यक्रम होणार होता.
त्यामुळे बाला शाळेत परफॉर्मन्ससाठी तयारी करत होता. तयारी सुरू होती यावेळी शाळेच्या वॉचमनने त्याला कोल्ड्रिंक्सची पिशवी दिली आणि त्याच्या पालकांनी ती एका नातेवाईकांकडून पाठवल्याचे सांगितले.
यानंतर त्या मुलाने ते कोल्ड्रिंक प्यायले आणि घरी गेला. घरी पोहोचल्यावर त्या मुलाने आईला विचारले यावेळी बोलता, बोलता मुलाला उलट्या होऊ लागल्या. त्यांनी कराईकल येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले.
राजेंद्रन आणि मालती शाळेत तपासासाठी गेले यावेळी त्यांनी व्हिडिओ फुटेज काढले. फुटेजमध्ये बालाच्या वर्गमित्राची आई सग्याराणी व्हिक्टोरिया चौकीदाराला थंड पेय देताना दिसत आहे. सग्याराणीने चौकीदाराला थंड पेय असलेली पांढरी पिशवी दिली. ती आपली नातेवाईक असल्याचे सांगून त्यांनी चौकीदाराला बॅग बालाकडे देण्यास सांगितले होते.
बाळाच्या पालकांनी शाळा व्यवस्थापनाला सांगितले की, त्यांचा मुलगा आणि सग्याराणी यांच्या मुलामध्ये शालेय वैमनस्य होते आणि दोघांमध्ये भांडण झाले. बालाच्या पालकांनी आरोप केला आहे की, सग्याराणीला तिच्या मुलाला प्रथम क्रमांक मिळवायचा होता म्हणून तिने विष प्राशन दिले.
या घटनेनंतर बालाच्या नातेवाईकांनी कराईकलमध्ये एकच गोंधळ घातला. उपचारादरम्यान शस्त्रक्रियेत झालेल्या चुकीमुळे बालाचा मृत्यू झाल्याचा आरोपही त्यांनी रुग्णालयावर केला.
0 Comments