मध्यप्रदेशातून 6 वर्षीय बालकाला आणुन 50 हजाराला विक्री; नंदुरबारमधील धक्‍कादायक घटना

 नंदुरबार : मध्यप्रदेश राज्यातून 6 वर्षीय बालकाला आणुन नंदुरबार शहरात 50 हजार रुपयांत विक्री केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बालकाचा उपयोग वेठबीगारी म्हणुन करण्यात येत होता. याप्रकरणी दोघांविरूध्द   नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी  दिलेल्या माहितीनुसार अल्पवयीन बालक रविन गुरलाल बारेला (वय अंदाजे 6 वर्षे, रा. खातला फाटा, मध्यप्रदेश  या बालकास मारोती (पुर्ण नाव गाव माहीत नाही) याने गुंडा नागो ठेलारी याला वेठबीगारी म्हणुन 50 हजार रुपये देवुन एका वर्षासाठी मेंढ्या चारण्यासाठी दिले. त्यानंतर गुंडा नागो ठेलारी याने बालकाला मेंढ्या चारण्यासाठी बालकाचा वापर करीत असतांना 4 सप्टेंबर 2022 रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास नंदुरबार शहरातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर असलेल्या कोळसा डेपोजवळ गुंडा नागो ठेलारी हा सदर बालकाकडुन मेंढ्या चारवित असतांना मिळुन आला.

पोलिसात गुन्‍हा दाखल

नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रविण जानकीराम पाटील यांच्या फिर्यादिवरून नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुंडा नागो ठेलारी (वय 45, रा. भोणे नंदुरबार), मारोती (पुर्ण नाव गाव माहीत नाही) यांच्या विरूध्द बाल कामगार (प्रतिबंध आणि वियमन) अधिनियम 1986 चे कलम 13, 14 सह ज्युवेनाईल जस्टीस कायदा 2015 चे कलम 75, 79 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास तपास अधिकारी सपोनि नंदा पाटील करीत आहेत.


Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e