सोलर प्‍लांटमधील कॉपर केबल चोरी; टोळी पोलिसांच्‍या ताब्‍यात

धुळे : घराच्‍या छतावर बसविलेल्‍या सोलर प्लांटमधून कॉपर केबल व सोलर प्लेट चोरी केली जात होती. याबाबत पोलिसांनी तपासचक्र फिरवून चोरी  करणाऱ्या टोळीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने मुस्क्या आवळल्या आहेत. 
साक्री  तालुक्यातील निजामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गेल्या काही दिवसांपासून सोलर प्लांटमधील कॉपर केबल व सोलर प्लेट चोरी जात असल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. यासंदर्भात संबंधित  पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देखील नोंदविण्यात आलेली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने निजामपूर पोलिसांनी तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागातर्फे तपासाची चक्र फिरवली. भामेर या गावातील दोन जण या चोरीमध्ये सहभागी असल्याचे उघडकीस आले. स्थानिक गुन्‍हे अन्वेषण विभागाच्या पथकाने या दोघांच्याही मूसक्या आवळल्या असून त्यांच्याकडून कारसह तीन लाखांहून अधिकचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

विकत घेणारेही ताब्‍यात

चोरी करून हे दोघेही चोर आणखी काही जणांना विकत असल्याची देखील माहिती उघडकीस आली होती. या अनुषंगाने विकत घेणाऱ्या तीन जणांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले असून या कारवाईमध्ये एकंदरीत पाच जणांच्या मुस्क्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने आवळल्या असून आणखी चार जणांचा शोध पोलीस घेत आहेत.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e